ठाणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा 18 वर

1127

ठाणे जिल्ह्यावरील कोरोनाचे संकट अधिक गडद होत असून गुरुवारी कोरोना ग्रस्तांची आकडेवारी तब्बल 18 वर पोहचली. गेल्या दोन दिवसात नवीन 7 रुग्ण आढळल्याने  भितीचे वातावरण पसरले आहे.

जिल्ह्यातील सहा महानगरपालिकांसह नगरपरिषद, जिल्हा शासकीय रुग्णालयासह विविध शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्षांची उभारणी करण्यात आली. ठाणे महापालिकाक्षेत्रात बुधवारी ठाण्यातील कळवा भागातील तर, कल्याण ग्रामीण आणि नवी मुंबईतील वाशी येथे प्रत्येकी एक असे तीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले. तर, गुरुवारी ठाणे पालिकाक्षेत्रातील लुईवाडी येथे एक, नवी मुंबई येथे दोन आणि कल्याण येथे एक असे 4 नवीन रुग्ण आढळून आले आहे.

 त्यामुळे आता ठाण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 3 झाली असून कल्याणमध्ये सहा तर, नवीमुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या सात जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. तसेच उल्हासनगरात एकाच व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 18 वर पोहोचली आहे.

पालिका क्षेत्र निहाय कोरोना बाधीत संख्या

  • ठाणे महापालिका 03
  • कल्याण-डोंबिवली पालिका 06
  • कल्याण ग्रामीण 01
  • नवी मुंबई महापालिका 07
  • उल्हासनगर पालिका 01
आपली प्रतिक्रिया द्या