Photo – मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समितीच्या वतीने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष शिवसेना नेते खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते आमदार अनिल परब, स्थानीय लोकाधिकार समिती उपाध्यक्ष माजी आमदार विलास पोतनीस तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.