
सामना ऑनलाईन, मुंबई
द योगा इन्स्टिटय़ूटला 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सोहळ्याला सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रपतींना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. योगा फॉर ऑल या योगा इन्स्टिटय़ूटच्या संचालिका हंसाजी योगेंद्र लिखित पुस्तकाचेही राष्ट्रपतींच्या हस्ते यावेळी प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रपतींनी या सोहळ्यानिमित्त आयोजित प्रदर्शनालाही भेट दिली. यावेळी राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवर उपस्थित होते.



























































