पुणे शहरात तीन घरफोड्यांमध्ये सव्वा लाखांचा ऐवज चोरीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरातील तीन ठिकाणी केलेल्या घरफोडीत चोरट्यांनी सव्वा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. या घटना धायरी, बिबवेवाडी, विश्रांतवाडी परिसरात घडल्या आहेत. बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी धायरीतील पाटोळे बिल्डींगमध्ये राहणाऱ्या मनिषा सचिन शिंदे (वय 24) यांच्या बंद फ्लॅटमध्ये चोरी केली. त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने, मोबाईल असा एकूण 69 हजार रुपयांचा ऐवज चोरण्यात आला. घरी आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे समजले. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस अधिक तपास करत आहेत.

बिबवेवाडीतील तुळशीनगर परिसरात बंद फ्लॅट फोडून 7 हजाराचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी शशांक शशिकांत तांबवेकर (वय 50) यांनी तक्रार दिली आहे. आळंदी रस्त्यावरील विश्रांतवाडीतील गौरव मेडीकलमध्ये चोरी झाली आहे. याप्रकरणी निवृत्ती दिनकर तांबे (वय 54) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दोन दिवसांपूर्वी निवृत्ती मेडिकल बंद करून गेले होते. त्यानंतर चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून 22 हजार 500 रुपये चोरून नेले.