
वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या व्हिडीओ सर्वेक्षणाचा आदेश देणाऱ्या न्यायाधीश रवी कुमार दिवाकर यांना पत्राद्वारे धमकी देण्यात आली आहे. ‘इस्लामिक आघाज मुव्हमेंट’ या संघटनेने ही धमकी दिली आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने न्यायाधीश दिवाकर यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. विभाजित राजकीय परिस्थितीत न्यायाधीशही भगवे झाले आहेत. तुम्ही मूर्तिपूजक आहात. त्यामुळे तुम्ही मशिदीला मंदिर घोषित कराल, असा दावा संघटनेचा कथित म्होरक्या कासिफ अहमद सिद्दीकीने धमकीच्या पत्रात केला आहे.


























































