15 कोटी किमतीचा ड्रग्ज आणि साडेतीन लाखांची रोकड जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एमडी, हेरॉईन, चरस आदी ड्रग्जची तस्करी करणाऱया तिघा आंतरराज्यीय ड्रग्ज तस्करांसह सात आरोपींना अटक करण्यात तसेच त्यांच्याकडून 15 कोटी किमतीचा ड्रग्ज आणि साडेतीन लाखांची रोकड हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी कक्षाच्या युनिटने शहरात विविध ठिकाणी धडक कारवाया केल्या. वरळी युनिटने 24 जानेवारी ते 5 फेब्रुवारी या दरम्यान सांताक्रुझ व वर्सोवा परिसरातून चार जणांना अटक केली होती. त्यांच्या ताब्यातून व घरातून पाच किलो 735 ग्रॅम मेफेड्रॉन ड्रग्ज व साडेतीन लाखांची रोकड जप्त केली होती. कांदिवली युनिटने गुरुवारी वांद्रे व कुर्ला परिसरात कारवाई करत दोघा तस्करांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून दोन कोटी किमतीचा हेरॉईन ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला होता. दरम्यान, आझाद मैदान युनिटने दहिसर चेक नाका परिसरात तिघांना पकडून एक कोटी 20 लाख किमतीचा मनाली चरस हस्तगत केला आहे. अशा प्रकारे अमली पदार्थविरोधी कक्षाच्या पथकांनी विविध ठिकाणी कारवाया करत जवळपास 15 कोटी किमतीचा डग्ज आणि साडेतीन लाखांची रोकड हस्तगत केली आहे.