
ड्रग्जची खरेदी-विक्री करणारे धारावी येथील तीन ड्रग्ज तस्कर अमली पदार्थविरोधी कक्षाच्या वरळी युनिटच्या हाती लागलेत. त्यांच्याकडून पोलिसांनी 24 लाख किमतीचा 140 ग्रॅम एमडी साठा हस्तगत केला आहे.
काही ड्रग्ज तस्कर धारावीच्या टी जंक्शनला येणार असल्याची खबर वरळी युनिटला मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने तेथे सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. दोघांकडेही एमडी ड्रग्ज मिळाला. पहिल्या आरोपीने त्याच्याकडे सापडलेला एमडी दुसऱया आरोपीकडून घेतल्याचे सांगितले. दुसऱया आरोपीकडे चौकशी केल्यावर त्याने धारावीत राहणाऱया अन्य आरोपीचे नाव सांगितले. त्यानुसार पोलिसांनी तिसऱया आरोपीला पकडले.
























































