खामगावात तीनजण पुरात वाहून गेले; एकाचा मृतदेह सापडला, दोघांचा शोध सुरू

sunk_drawn

बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात बोर्डी नदीला आलेल्या पुरात बकर्‍यांसह तीनजण वाहून गेल्याची घटना माक्ता-कोक्ता शिवारात घडली आहे. पूरात वाहून गेलेल्यांपैकी एकाचा मृतदेह सापडला आहे. तर इतर दोघांचा शोध सुरू आहे.

माक्ता कोक्ता येथील गजानन लहान रणशिंगे (वय 35) व राहुल गजानन रणशिंगे (वय 16) हे बापलेक आणि दिलीप नामदेव कळसकार ( वय 40) असे तिघे सोमवारी सकाळी बकर्‍या चारण्यासाठी गेले होते. त्यावेळी बोर्डी नदीवरील पुलावरून जाताना नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात काही बकर्‍या वाहून जात होत्या. बकऱ्या वाहत असल्याचे पाहून बकर्‍यांना वाचविण्याच्या प्रयत्नात ते तिघेही पाण्यात वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी पूलावर धाव घेतली. बोर्डी नदीत काही अंतरावर दिलीप कळसकार यांचा मृतदेह आढळून आला. रणशिंगे बापलेकांचा शोध सुरू आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या