नरभक्षक वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

23

सामना प्रतिनिधी । नागपूर

चंद्रपूर जिल्हयाच्या ब्रम्हपुरी तालुक्यांतर्गत येत असलेल्या हळदा येथील एका शेतकऱ्यावर गावाजवळील कालव्याला लागून असलेल्या जंगला शेजारील शेतात गुरे चरायला गेला असतांना नरभक्षक वाघाने हल्ला करून 200 मीटर ओढत नेऊन जीव घेतल्याची घटना शनिवारी सकाळी 11.30च्या सुमारास घडली. त्यावेळी त्याच्यासोबत असलेल्या दोन गुराख्यांनी ओरडाओरड केली पण आक्रमक वाघाने त्याला सोडले नाही. त्यामुळे गाव परिसरात दहशत निर्माण झाली आहे. सदर मृत शेतकऱ्याचे नाव दिवाकर बाबुराव गेडाम (वय45) असे आहे. सततच्या हल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोचले.

वनविभागाच्या सहा.उपवनसरंक्षक अधिकारी श्रीमती बोनगळे यांनी मृताच्या कुटुंबातील सदस्याला घटनास्थळी रोख 20 हजार रुपये रोख दिले आणि मृतदेहाच्या उत्तरीय तपासणी दरम्यान रुग्णालयात 2 लाख 80 रु.देण्याचे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी शांत होत मृतदेह ब्रम्हपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविला.

आपली प्रतिक्रिया द्या