फेक कॉल कराल तर व्हाल ब्लॉक, ट्रायचा कारवाईचा बडगा

केंद्र सरकारने स्पॅम कॉल किंवा फ्रॉड कॉलबाबत अधिक कठोर निर्णय घेण्याची तयारी केलेली आहे. त्यामुळे सरकारी संस्था टेलिकॉम रेग्युलेटरी अथोरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) मोबाईल नेटवर्क संदर्भात नवीन नियम आणले असून ते येत्या 1 सप्टेंबर 2024 पासून देशभर लागू होणार आहेत. हे नियम लागू झाल्यानंतर नको असलेल्या कॉल्सपासून सर्वसामान्य ग्राहकांची सुटका होणार आहे. जर तुमच्या नंबरवरून कुणी फेक कॉल केला तर त्या टेलिकॉम कंपनीला जबाबदार मानले जाईल.

तुम्ही तुमच्या मोबाईल क्रमांकावरुन टेलिमार्केटिंग केले तर तुमचा मोबाईल क्रमांक दोन वर्षांसाठी ब्लॅक लिस्ट केला जाणार आहे. कारण आता टेलिमार्केटिंग करणाऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या टेलिकॉम मंत्रालयाने नवीन मोबाईल नंबर सिरीज जारी केलेली आहे. टेलिकॉम कम्युनिकेशन विभागाने नवीन 160 नंबर सिरीज फायनान्शिय फ्रॉड रोखण्यासाठी जारी केली आहे. ट्रायने सर्व टेलिकॉम कंपन्यांना निर्देश दिले आहेत. त्याअंतर्गत 30 सप्टेंबरपर्यंत 140 नंबरवरून सुरू होणाऱ्या सीरीजने टेलिमार्केटिंग कॉल्स आणि कमर्शिअल मेसेजिंगला वन टाईम पासवर्ड, प्रमोशनल मेसेज ब्लॉक चेन बेस्ड डीएलटी प्लॅटफॉर्मवर शिफ्ट करण्यास सांगितले.

अशा प्रकारच्या कॉल आणि मॅसेजना बंदी

नवीन नियम लागू झाल्यानंतर नवीन नियम लागू झाल्यानंतर अनवॉण्टेड कॉल्स आणि मेसेजच्या समस्येपासून सुटका होऊ शकेल, असे मानले जात आहे. कारण नवीन नियमाप्रमाणे आपोआप तयार होणारे कॉल्स आणि मेसेज देखील समाविष्ट केलेले आहेत, ज्या कॉलना रोबोटिक कॉल आणि मॅसेज देखील म्हणतात.

1 नोव्हेंबर 2024 पासून मेसेज पाठवणारे आणि मेसेज रिसीव्ह करणारे अशा दोघांची माहिती मिळवणे अशी ट्रायची योजना आहे. ट्रायच्या निर्देशांनुसार, पुणी 140 किंवा 160 नंबरच्या सीरीजपेक्षा प्रमोशनल मेसेज केलेत, तर असे मेसेज स्वीकार होणार नाहीत.