अंबरनाथमध्ये शिवसेनेने लावलेली झाडे समाजकंटकांनी तिसऱ्यांदा जाळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । अंबरनाथ

चार महिन्यांपूर्वी कल्याण लोकसभा मतदारसंघातील अंबरनाथ येथील खुंटवली गावात शिवसेनेने लोकसहभागातून लावण्यात आलेल्या 60 हजार झाडांना आग लावून पेटवण्याचा प्रकार शुक्रवारी काही समाजकंटकांकडून करण्यात आला. या आगीमध्ये 25 हजार झाडे भस्मसात झाली आहेत. मागच्याच आठवड्यात मांगरुळ येथे लावलेल्या 1 लाख झाडांना काही समाजकंटकांकडून आग लावण्यात आली, त्यामध्ये 70 टक्के झाडांची राख रांगोळी झाली होती.

दरम्यान, तिसऱ्यांदा असा प्रकार झाल्याने त्यामागे घातपात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या घटनेला वनविभागच जबाबदार असून झाडे जगवण्याची जबाबदारी पार पाडता येत नसेल तर 50 कोटी झाडे कशी जगवणार, असा सवाल विचारला जात आहे.