
स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना अनोखे अभिवादन करण्यासाठी ताडदेवमध्ये पालिकेकडून आकर्षक ‘स्वरांचा कल्पवृक्ष’ साकारला जाणार आहे. लता मंगेशकर यांच्या प्रथम स्मृती दिनाचे औचित्य साधून या स्मृती स्तंभाचे भूमिपूजन आज लतादीदींच्या भगिनी उषा मंगेशकर यांच्या हस्ते पर्यटन मंत्री-पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. दरम्यान, प्रभूकुंज निकासस्थानाच्या संरक्षक भिंतीकरदेखील भित्तीशिल्प साकारण्यात येणार आहे.
‘स्वरांचा कल्पवृक्ष’ स्मृतिस्तंभ मुंबई महानगरपालिकेच्या कतीने व लोढा फाऊंडेशनच्या सहकार्याने उभारण्यात येणार आहे. ‘डी’ विभागातील वत्सलाबाई देसाई चौक (हाजी अली जंक्शन, ताडदेव) येथील वाहतूक बेटामध्ये ’स्वरांचा कल्पकृक्ष’ या संकल्पनेवर आधारित स्मृती स्तंभ उभारण्यात येणार आहे. तसेच मुंबई सुशोभीकरणात पेडर रोड डॉ. गोपाळराव देशमुख मार्ग येथील मंगेशकर कुटुंबीयांच्या ‘प्रभूकुंज’ या निवासस्थानाच्या दर्शनी भिंतीवर भित्तिशिल्पदेखील साकारण्यात येणार आहे. या दोन्ही कामांच्या भूमिपूजनप्रसंगी मीनाताई मंगेशकर-खडीकर, आदिनाथ मंगेशकर, प्रसिद्ध गायक नितीन मुकेश, प्रसिद्ध अभिनेते शिकाजी साटम, इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स व इंडस्ट्रीजचे अध्यक्ष अनंत सिंघानिया, मंगेशकर कुटुंबातील इतर सदस्य, सहायक आयुक्त शरद उघडे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वरांचा कल्पवृक्ष
हा स्तंभ स्टील व खरेखुरे झाड यांचा वापर करून साकारण्यात येणार आहे. या स्तंभाची उंची सुमारे 40 फूट असेल. झाडाच्या सतत वाढीस चालना देण्यासाठी पूर्णपणे मातीचा वापर करण्यात येणार आहे. जादुई स्वरूपाचे रूपक तयार करण्यासाठी मिरर स्टील उपयोगात आणले जाणार आहे. सदर स्तंभाच्या कलाकृतीतून धरतीचे आकाशाशी झालेले मीलन चित्रित करण्यात येणार आहे.
भित्तीशिल्पाची वैशिष्टय़े
या भित्तिशिल्पातून भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जीवनप्रवासातील ठळक तसेच विशेष उल्लेखनीय प्रसंग दर्शविण्यात येणार आहेत. क्यू आर कोडच्या माध्यमातून लतादीदींच्या किशेष छबी, सादरीकरणाची चित्रणे, नाकाजलेली अजरामर गीते, सहकाऱयांची मनोगते इत्यादी बाबी अंतर्भूत करण्याचे देखील नियोजित आहे. या भित्तिशिल्प 40 फूट लांब क 15 फूट रुंद आकाराचे असेल. त्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे.