कुडाळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन साजरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कुडाळ

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतीदिन कुडाळ येथील शिवसेना शाखेत शनिवारी साजरा करण्यात आला. यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी जिल्हा परीषद सदस्य संजय पडते, सभापती राजन जाधव, तालुका प्रमुख राजन नाईक, माजी उपसभापती बबन बोभाटे, माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे, नगरसेवक गणेश भोगटे, सचीन काळप, सौ. मेघा सुकी, संदीप म्हाडेश्वर, गंगाराम सडवेलकर, सतीश कुडाळकर, महेश राऊळ आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.