मुलाला धडक देऊन पळालेला ट्रक चालक अटकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सायकलिंगसाठी गेलेल्या बारा वर्षांच्या मुलाला धडक देऊन पळून गेलेल्या ट्रक चालकाला अखेर एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. प्रेमलाल वर्मा असे त्याचे नाव असून त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

बोरिवली येथे राहणारा दक्ष मालू हा रविवारी सकाळी त्याचे वडील आणि नातेवाईकांसोबत सायकलिंगसाठी निघाला होता. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर त्याला ट्रकने धडक दिली. त्यामध्ये रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. दक्षच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा नोंद केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांच्या पथकातील उपनिरीक्षक खोत, चव्हाण, पवार यांच्या पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी जोगेश्वरी ते मुलुंड दरम्यानच्या 150हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. एका फुटेजमध्ये पवईहून मुलुंडच्या दिशेने एक ट्रक जात असल्याचे दिसले. त्या ट्रकवर ट्रान्सपोर्ट कंपनीचे नाव होते. तोच धागा पकडून पोलिसांनी तपास पुढे नेत ट्रकचालकाला अटक केली.