सामना ऑनलाईन, लातूर
ऊन्हाचा तडाख्याने महाराष्ट्रामध्ये आणि कदाचित देशातील पहिला बळी गेला आहे. लातूरमध्ये एका ट्रकचालकाचा मृत्यू झाला आहे. हा ट्रकचालक मल्टीअॅक्सेल ट्रेलर चालवत होता आणि शिरूर ताजबंद भागातील पेट्रोलपंपासमोर तो थांबला होता. इथेच त्याचा मृत्यू झाल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे.
जी माहिती कळाली आहे त्यानुसार हा ट्रकचालक नवा कोरा मल्टीअॅक्सेल ट्रेलर चालवत होता. मंगळवारी रात्री 8 च्या सुमारास या ट्रेलरचे चाक पंक्चर झाल्याने तो पेट्रोलपंपाजवळ थांबला होता. यावेळी या चालकाने पंक्चरच्या दुकानात बसून पाणी प्यायले. पाणी पिताच काही सेकंदातच त्याला उलटी झाली आणि तो जागीच मृत्यूमुखी पडला. दिवसभर उन्हातून ट्रक चालवल्याने आणि अचानक भरपूर पाणी प्यायल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. मयत चालकाची ओळख पटलेली नाहीये.




























































