
स्टार खेळाडूंच्या गैरहजेरीत मैदानावर उतरलेल्या गतविजेत्या फ्रान्सला फिफा वर्ल्ड कपमध्ये टय़ुनिशियाने पराभवाचा धक्का दिला. ‘डी’ गटातील या लढतीत टय़ुनिशियाने 1-0 गोल फरकाने विजय मिळविला, पण त्यांना बाद फेरी गाठण्यात अपयश आले.
‘डी’ गटात विजयानंतरही 4 गुणांसह तिसऱया स्थानी राहिल्याने ‘जीतकर भी हारनेवाले को टय़ुनिशिया कहते है,’ अशी म्हणायची वेळ आलीय. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने डेन्मार्कचा पराभव करून या गटात बाद फेरी गाठली, तर फ्रान्सचा संघ पराभवानंतरही 6 गुणांसह अव्वल स्थानी राहिला. विजयाची पाटी कोरी राहिलेला डेन्मार्कचा संघ गुणतालिकेत तळाला राहिला. फिफा क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या फ्रान्सला 30 व्या मानांकित टय़ुनिशियाने पराभूत करून आणखी एक धक्कादायक निकाल नोंदविला. कर्णधार वाहबी खाजरीने 58 व्या मिनिटाला केलेला गोल स्पर्धेतील एकमेव गोल ठरला.
फिफा वर्ल्ड कप गुणतालिका
गट ए
संघ सा. वि. ड्रॉ प. गुण
नेदरलॅण्ड्स 3 2 1 0 7
सेनेगल 3 2 0 1 6
इक्वाडोर 3 1 1 1 4
कतार 3 0 0 3 0
गट बी
इंग्लंड 3 2 1 0 7
अमेरिका 3 1 2 0 5
इराण 3 1 0 2 3
वेल्स 3 0 1 2 1
गट डी
फ्रान्स 3 2 1 0 7
ऑस्ट्रेलिया 3 2 0 1 6
टय़ुनिशिया 3 0 2 1 2
डेन्मार्क 3 0 1 2 1
गट एफ
क्रोएशिया 2 1 1 0 4
मोरोक्को 2 1 1 0 4
बेल्जियम 2 1 0 1 3
कॅनडा 2 0 0 2 0
गट जी
ब्राझील 2 2 0 0 6
स्वित्झर्लंड 2 1 0 1 3
कॅमेरून 2 0 1 1 1
सर्बिया 2 0 1 1 1
गट एच
पोर्तुगाल 2 2 0 0 6
घाना 2 1 0 1 3
द. कोरिया 2 0 1 1 1
उरुग्वे 2 0 1 1 1
(टीप – सा – सामने, वि – विजय, प – पराभव)
ही गुणतालिका ऑस्ट्रेलिया-डेन्मार्कपर्यंतची आहे.