
हिंगोली आणि नांदेड जिल्हयांत शनिवारी सकाळी भूकंपाचे दोन धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या धक्क्यांची तीक्रता अनुक्रमे 3.3 आणि 4.5 एवढी नोंदवली गेली. यात जीवित वा वित्तहानी झाली नाही. पहिल्या धक्क्याचा केंद्रबिंदू औंढा नागनाथ तालुक्यातील गढाळा परिसरात होता तर दुसऱ्या धक्क्याचा केंद्रबिंदू वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावात होता.




























































