
काळबादेवी येथील आदित्य हाईट्समधील के.डी.एम. इंटरप्रायजेसमध्ये चार अज्ञात व्यक्तीनी मोठा हात मारला. अचानक घुसलेल्या चौघांनी तेथील दोघांना बांधून तब्बल चार कोटींची रोकड चोरून नेली. याबाबत तक्रार दाखल होताच पोलिसांनी चपळाईने तपास सुरू करून रोकड घेऊन गुजरातला पळून गेलेल्या सहा जणांच्या मुसक्या आवळल्या. आरोपींकडून चोरीची सर्व रोकड पोलिसांनी हस्तगत केली.
रविवारी सुट्टीचा दिवस असताना काळबादेवी येथे आरोपींनी मोठे कांड केले. के.डी.एम. इंटरप्रायजेसमध्ये घुसून चोरांनी 4 कोटींची रोकड लंपास केली. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर सहाय्यक आयुक्त ज्योत्स्ना रासम, लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्वर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके तयार करून गुह्याचा तपास सुरू करण्यात आला. आरोपी गुजरातला पळून गेल्याचे निष्पन्न होताच पथक त्या दिशेने पाठविण्यात आले. अखेर पथकाने 6 आरोपींना पकडून चोरीची सर्व रोकड हस्तगत केली.




























































