बिहारमध्ये शालेय सुट्टय़ांसाठी दोन कॅलेंडर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारमध्ये 2024 साठी दोन शालेय कॅलेंडर जारी करण्यात आली आहेत. उर्दू माध्यम शाळा आणि इतर माध्यमातील शाळांसाठी स्वतंत्र सुट्टय़ांची यादी तयार केली आहे. बिहार राज्याच्या शिक्षण विभागाने जारी केलेल्या कॅलेंडर नुसार 2024 मध्ये महाशिवरात्री, जन्माष्टमी, रक्षाबंधन, हरितालिका आणि जितिया यांसारख्या सणांना सुट्टी मिळणार नाही. तर उर्दू माध्यमांच्या शाळांना ईद-उल-फित्र आणि ईद-उल-अधा (बकरी ईद) साठी तीन दिवसांसाठी सुट्टी देण्यात आली आहे, परंतु उर्दू माध्यम नसलेल्या शाळांना दोन्ही ईदच्या सणांना फक्त एक दिवस सुट्टी असणार आहे.  दरम्यान, यंदाच्या शाळेच्या कॅलेंडर मध्ये हरितालिकेला दोन दिवस आणि जितियाला एक दिवस सुट्टी होती, परंतु या सुट्टय़ा 2024 मध्ये मिळणार नाहीत. तसेच बिहारच्या शिक्षण विभागाने उर्दू माध्यमाच्या शाळा आणि उर्दू नसलेल्या शाळांसाठी स्वतंत्रपणे दोन कॅलेंडर जारी करण्याची ही पहिलीच वेळ आहे.