
पाण्यावरून झालेल्या क्षुल्लक वादातून दोन विद्यार्थ्यांनी पीजी मालकाला बेदम मारहाण करत त्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही विद्यार्थ्यांना अटक केली आहे. बंगळुरूतील राममूर्ती नगर पोलीस ठाण्याअंतर्गत सोमवारी सायंकाळी ही घनटा घडली. राकेश आणि डॉन ब्राइट सन अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, राकेश हा बी.कॉम.च्या अंतिम वर्षाचा, तर डॉन ब्राइट सन हा बीबीएच्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी आहे. दोन्ही आरोपी नळाच्या पाण्याने पाय धुत असताना पीजी मालक माधव मतले यांनी यावर आक्षेप घेतला. यामुळे मतले आणि आरोपी यांच्यात जोरदार वाद झाला. या वादातून आरोपींनी मतले यांना क्रिकेट बॅटने जबर मारहाण केली. यात मतले यांचा मृत्यू झाला.
राममूर्ती नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत. पोलीस पुढील तपास सुरू आहे.

























































