
सामना ऑनलाईन । श्रीनगर
जम्मू कश्मीरमध्ये सैन्य दल आणि दहशतवाद्यांमध्ये उडालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. कश्मीरच्या कुलगामधील काटापोरा-यारीपोरा भागात सुरक्षादलाने शोधमोहीम हाती घेतली होती. या मोहीमेदरम्यान सैन्य दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली.
Jammu and Kashmir: Encounter breaks out between security forces and terrorists in Katapora area of Kulgam. 2-3 terrorists are believed to be trapped. Firing underway.
— ANI (@ANI) January 12, 2019
या चकमकीत सैन्य दलाला दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले आहेत. तर अजूनही एक दहशतवादी लपला असल्याची संशय व्यक्त केला जात आहे. ही चकमक अजून सुरू असून कुलगामधील संपूर्ण इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
























































