
हिमाचल प्रदेशात काही भागांमध्ये हिमवृष्टीला सुरुवात झाली आहे. धौलाधार पर्वतरांगेत बुधवारी रात्रीपासून या हंगामातील पहिल्या हिमवृष्टीला सुरुवात झाली असून लगातार सुरूच आहे. या हिमवृष्टीत लाहौल-स्पितीमध्ये 300 लोक अडकून पडले असून, त्यापैकी दोन महिलांचा मृत्यू झाला आहे.
हिमवर्षावामुळे हिमाचल प्रदेशात अडचणी निर्माण झाल्या आहेत. लाहौल-स्पितीमध्ये यात्रेदरम्यान हिमवर्षावामुळे 300 लोक अडकून पडले आहेत. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तात्काळ बचावकार्य सुरू केले. मात्र, या बचावकार्यादरम्यान दोन महिलांचा मृत्यू झाला.

























































