उजनी धरणातील पाणीसाठा आला शून्यावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर जिह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण गेल्या पाच वर्षांनंतर पहिल्यांदाच एक महिना उशिराने म्हणजे जून महिन्यात मायनसमध्ये गेले आहे. यापूर्वी मे महिन्याच्या मध्यात अचल पाणीसाठा शून्यावर जात होता. गेल्या दोन वर्षांपासून पाऊस चांगला झाल्याने उजनी धरणात समाधानकारक पाणीसाठा होता. आज उजनीतील उपयुक्त पाणीसाठा शून्य टक्क्यावर आला आहे.

गतवर्षी पावसाळा संपल्यानंतर अवकाळी पावसाने शेतकऱयांना दिलासा दिला होता. त्यातच उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. परिणामी रब्बी हंगामातील पाण्याची आवर्तने पुढे ढकलण्यात आली होती. गतवर्षी 7 जून रोजी उजनीतील पाणीपातळी वजा 22.44 टक्के होती. यंदाच्या वर्षी मात्र ही स्थिती नाही. दरवर्षी सोलापूर जिह्यात जुलैमध्ये किंवा अखेरिस मान्सून दाखल होत असतो. त्यामुळे पिकांसाठी वितरित करावी लागत होती. गेल्या आठ दिवसांपासून दररोज एक ते अर्धा टक्के इतका पाणीसाठा कमी होत आहे. उजनी धरणातून सध्या उपयुक्त कालवा, बोगदा, सीना माढा जलसिंचन योजनेत पाणी सोडले जात आहे.

उजनी धरणाची पाणीपातळी

  • एकूण पाणीपातळी 490.995 मीटर
  • एकूण पाणीसाठा 1795.91 दलघमी
  • उपयुक्त साठा 6.90 दलघमी
  • एकूण पाणीसाठा 63.41 टीएमसी
  • उपयुक्त साठा 0.24 टीएमसी
  • टक्केवारी 0.46 टक्के