
उज्जैनमधील फ्रिगंज येथील एका खासगी कोविड रुग्णालयाला रविवारी सकाळी आग लागल्याने 4 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यातील एका जणाची प्रपृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेवेळी हॉस्पिटलमध्ये 80 रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यापैकी 24 रुग्ण हे कोरोनाचे होते. सर्व रुग्णांना दुसऱया हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. शॉर्टसर्पिटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.
फ्रिगंजमध्ये पाटीदार हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर या नावाने उमाशंकर पाटीदार यांचे हॉस्पिटल आहे. दोन मजल्यांच्या या खासगी हॉस्पिटलमध्ये रविवारी सकाळी 11.30 वाजता दुसऱया मजल्यावरी कोविड वॉर्डमधील वॉर्डबॉयने धूर येताना बघितला. त्याने याची माहिती व्यवस्थापनाला दिली. बघता बघता इमारतीत हा धूर पसरला. यामुळे खिडक्या तोडून रुग्ण कसेबसे बाहेर पडले. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 गाडय़ा घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले.
अलार्म वाजलाच नाही
हॉस्पिटलमधील फायर अलार्म असूनही तो घटनेवेळी वाजलाच नाही. यामुळे अग्नी सुरक्षेवरून हॉस्पिटलवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. आग नियंत्रणात आणणारे उपकरणेही योग्य नव्हती असा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. तर अग्निशमन दल येण्यापूर्वी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा दावा हॉस्पिटल प्रशासनाने केला आहे.


























































