आमदारांच्या अपात्रतेवर विवेकास धरून निर्णय करा, उल्हासदादा पवार यांचा नार्वेकरांना सल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आमदारांच्या अपात्रतेबाबत तत्कालीन विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी यांनी दिलेला निवाडा डोळ्यापुढे आणावा आणि वाद टाळण्यासाठी विवेकास धरून निर्णय द्यावा, असा सल्ला काँग्रसचे नेते उल्हासदादा पवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिला आहे.

वर्धा येथील सहकार नेते प्रा. सुरेश देशमुख यांच्या अमृत महोत्सवी नागरी सत्कार प्रसंगी अध्यक्षीय भाषण करताना ते बोलत होते. विशेष म्हणजे यावेळी अरुण गुजराथी व्यासपीठावर उपस्थित होते. अध्यक्षांचा निर्णय विवेकनिष्ठ असावा. सद्सदविवेकबुद्धीला धरून असावा. म्हणजे तो विवादास्पद राहणार नाही. त्यासाठी सोमनाथ चटर्जी यांचे पक्षातीत निर्णय तपासले पाहिजे, असा सल्लाही उल्हासदादा पवार यांनी दिला.