उरण- कंटेनर यार्डच्या मालकांनी रस्ता केला गिळंकृत

485

उरण तालुक्यातील महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून येथील खासगी कंटेनर यार्डच्या मालकांनी रात्रीच्या अंधारात शेत जमीन परिसरातून जाणाऱ्या रस्त्यावर दगड मातीचा भराव करून नागरिकांच्या, शेतकऱ्यांचा सार्वजनिक रस्ताच गिळंकृत करण्याचा प्रकार उरण तहसील कार्यालयाच्या हद्दीत सुरू केला आहे. या घटनेमुळे कोप्रोली गाव परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

उरण तालुक्यात सध्या स्थानिक ग्रामपंचायत, महसूल अधिकारी यांच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणात कंटेनर यार्डचे जाळं पसरत चालले आहे. त्यामुळे कंटेनर यार्डचे मालक खुलेआम राजरोसपणे शेतकऱ्यांचे रहदारीचे रस्ते, नैसर्गिक नाले बुजविण्याचे भयानक प्रकार समोर येत आहेत.तशा प्रकारचे कृत्य कोप्रोली ग्रामपंचायत हद्दीत घडले आहे.कोप्रोली ग्रामस्थांचे ग्रामदैवत असलेल्या श्री बापदेव ते कोप्रोली गाव या ठिकाणी शेतकरी, भाविकांसाठी ये-जा करण्यासाठी ग्रामस्थांच्या आग्रह खातर सार्वजनिक रस्त्याची निर्मिती ही तत्कालील आमदार मनोहर भोईर यांनी शासकीय निधीच्या माध्यमातून केली होती.

परंतु विकासाच्या नावाखाली कंटेनर यार्डच्या मालकांनी, व्यवस्थापनाने जिल्हाधिकारी यांच्या डोळ्यात धूळफेक करीत आणि कोप्रोली सजा तलाठी व मंडळ अधिकारी यांना हाताशी धरून चक्क रात्रीच्या अंधारात शेतजमिनीवर, सार्वजनिक रस्त्यावर दगड मातीचा भराव टाकून गावकऱ्यांचा सार्वजनिक रस्त्याच गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला आहे.हि घटना कोप्रोली गाव परिसरातील शेतकऱ्यांच्या, ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यावर या घटनेचा ग्रामस्थांकडून निषेध व्यक्त करण्यात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या