सर्जिकल स्ट्राईकवर आधारित ऊरी चित्रपटाचा नवा टीझर पाहिला का ?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

सर्जिकल स्ट्राईकवर आधारित ऊरी या चित्रपटाचा नवा टीझर लाँच झाला आहे. ५ डिसेंबरला ट्रेलर प्रदर्शित होणार असल्याचे या टीझरमध्ये सांगण्यात येत आहे.

या चित्रपटात विकी कौशल आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या भुमिकेत योगेश सोमण दिसणार आहे. ट्विटरवर आणि इतर सोशल मीडियावर हा ट्रेलर प्रदर्शित झाला असून #uri_trailer या हॅशटॅगने सोशल मीडिया युसर्सने हा ट्रेलर शेअर केला आहे.  ११ जानेवारी २०१९ रोजी या चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.