कुंभसाठी कोरोना टेस्ट आवश्यक! उच्च न्यायालयाची मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांना चपराक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वेगानं वाढत असल्यानं उत्तराखंडमधी कुंभमेळ्यावर देखील त्याचा परिणाम पाहायला मिळत आहे. उत्तराखंडच्या उच्च न्यायालयाला निर्देश दिले आहेत की, कुंभमेळ्यात येणाऱ्या सर्वांना RT-PCR टेस्टचा निगेटिव्ह रिपोर्ट दाखवणे अनिवार्य होणार आहे.

उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांच्या त्या निर्णयाची निंदा केली, ज्यामध्ये त्यांनी विना टेस्ट कुंभमेळ्यात प्रवेश देण्याची परवानगी दिली होती.

कुंभमेळ्यासंदर्भातील एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने निर्देश दिला आहे की केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शकतत्त्वांचे अत्यंत कठोरपद्धतीने पालन करण्यात यावे.

सोबत उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, ज्या लोकांनी लस घेतली आहे, त्यांनी आपले सर्टिफिकेट दाखवल्यास त्यांना सूट देण्यात येईल. मात्र अन्य लोकांना कोरोना टेस्टचा निगेटिव्ह रिपोर्ट दाखवणे जरूरी आहे.

तीरथ सिंह रावतने यांनी बदलला होता माजी मुख्यमंत्र्यांचा निर्णय

उत्तराखंड या महिन्यात कुंभमेळा सुरू झाला. माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी आधी कुंभमध्ये येणाऱ्या लोकांसाठी कडक नियम केले होते आणि RT-PCR निगेटिव्ह रिपोर्ट अनिवार्य करण्यात आला होता.

मात्र तीरथ सिंह रावत यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर त्यांनी सर्व नियम काढून टाकले होते. त्यामुळे त्यांच्यावर टीका होत होती.