‘वंदे भारतम्’ नृत्य महोत्सव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून केंद्रिय सांस्कृतिक मंत्रालयाने ‘वंदे भारतम्’ नृत्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या या स्पर्धेचा उद्देश पुढील वर्षी म्हणजेच 2022 च्या प्रजासत्ताकदिनी राजपथावरील परेडदरम्यान होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी नर्तकांची निवड करणे हा आहे. इच्छुक स्पर्धक 17 ते 25 नोव्हेंबरदरम्यान वंदे भारत मोबाईल अॅपच्या माध्यमातून स्पर्धेत सहभाग घेऊ शकतात. 19 डिसेंबरला नवी दिल्लीमधील तालकटोरा स्टेडियममध्ये अंतिम फेरी पार होईल. त्यातून देशभरातून केवळ 480 स्पर्धकांची निवड केली जाईल, अशी माहिती सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी दिली आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी-  www.vandebharatamnrityautsav.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.