ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठ नाटककार, पत्रकार आणि लेखक जयंत पवार यांचे निधन झाले आहे. शनिवारी रात्री त्यांना अस्वस्थ वाटल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे उपचारांदरम्यान त्यांचे निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी पत्रकार, लेखिका संध्या नरे आणि मुलगी असा परिवार आहे. जयंत पवार यांनी लिहिलेली अनेक नाटके गाजली आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने घेतलेल्या नाट्यलेखन स्पर्धेत ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकासाठी जयंत पवार यांना सर्वोत्कृष्ट लेखनाचे प्रथम पारितोषिक मिळाले.

2014च्या जानेवारी महिन्यात महाड येथे झालेल्या 15व्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद जयंत पवार यांनी भूषवले होते. फिनिक्सच्या राखेतून उठला मोर या कथासंग्रहासाठी सन 2012 चा साहित्य अकादमी पुरस्कार देखील मिळाला होता.

जयंत पवार यांचे नाट्यलेखन –

अंधातर
काय डेंजर वारा सुटलाय
टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन
दरवेशी
पाऊलखुणा
फिनिक्सच्या राखेतून उठला मोर
बहुजन संस्कृतिवाद आणि लेखक
माझे घर
वंश
शेवटच्या बिभत्साचे गाणे
होड्या