
बॉलीवूडचे प्रसिद्ध जोडपे कतरीना कैफ आणि विकी कौशल यांचा रोका नुकताच पार पडला आहे. प्रसिद्ध दगडर्शक कबीर खान यांच्या घरी हा सोहळा पार पडला. यावेळी विकी व कतरीनाच्या घरचे जवळचे नातेवाईक उपस्थित होते…
कतरिना व विकी हे येत्या डिसेंबर महिन्यात राजस्थानमध्ये विवाहबंधनात अडकणार असल्याचा चर्चा आहेत. राजस्थानमधील एक राजवाडा त्यांनी लग्नासाठी तीन दिवस बुक केलेला आहे. 7 ते 9 डिसेंबर पर्यंत त्यांच्या विवाहसोहळा पार पडणार आहे. सध्या त्यांची लग्नाची खरेदी चालू असून प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यासाची त्यांच्या लग्नाचे कपजे डिझाईन करत आहे.
कतरिनाने कबीर खान यांच्या एक था टायगर व न्यूयॉर्क या चित्रपटात काम केलेले आहे.कतरिना ही कबीर यांच्या कुटुंबीयांच्या जवळची असल्याने कबीर व मिनी माथूर यांनी तिचा रोका त्यांच्या बंगल्यावर केला. या रोकाच्या कार्यक्रमाच्या वेळी विकी कौशलचे आई वडील व भाऊ सनी कौशल तर कतरिनाकडून तिची बहिण इजाबेल कैफ उपस्थित होते.




























































