दिल्लीत ‘आयफोन’वरून राडा, ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये दे दणादण; Video व्हायरल

‘आयफोन-15’ची सिरीज नुकतीच लॉन्च करण्यात आली. हा फोन खरेदी करण्यासाठी रिटेल स्टोअर्समध्ये झुंबड उडाली असून अनेक काही ग्राहकांनी अनेक तास रांगेमध्ये उभे राहून फोनची खरेदी केली. ग्राहकांमध्ये ‘आयफोन-15’ची प्रचंड क्रेझ आहे. स्टोअर्सबाहेर लांबच लांब रांगा लागल्या असून यामुळे कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये चकमकही उडत आहे.

राजधानी दिल्लीतील कमलानगर भागातील एका मोबाईल दुकानातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात मोबाईलच्या दुकानातील कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये तुफान हाणामारी होताना दिसतेय. आयफोन देण्यास उशीर केल्याने हा राडा झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ग्राहकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

रुपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपनगरच्या बंगला रियाद येथील क्रोमा शोरूममध्ये शुक्रवारी दुपारी ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जसकीरत सिंग आणि मनदीप सिंग यांनी क्रोम सेंटरमधून ‘आयफोन-15’ बूक केला होता आणि 22 सप्टेंकरला त्याची डिलीव्हरी होणार होती. मात्र काही कारणास्तव दुकानदार ‘आयफोन-15’ची डिलीव्हरी करू शकला नाही. याचा राग आल्याने दोघांनी क्रोमा शोरूममधील कर्मचाऱ्यांना मारहाण सुरू केली. पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.

दरम्यान, अ‍ॅपलने 12 सप्टेंबरला आयफोन 15, आयफोन 15 प्लस, आयफोन 15 प्रो, आयफोन 15 प्रो मॅक्स असे चार मॉडेल लाँच केले आहेत.

काय आहे खास?

आयफोन 15 मध्ये युएसबी व सी पोर्ट चार्जिंग देण्यात येणार आहे. आयफोन प्रो मॉडेल्सला सी पोर्ट देण्यात येणार आहे तर वॅनिला मॉडेल्सला युएसबी 2.0 स्टँडर्ड पोर्ट देण्यात येणार आहे. तसेच याला 35W चे चार्जिंग सपोर्टही देण्यात आले आहे. आयफोन 15 प्रो ला क्लासिक लूक देण्यासाठी स्टेनलेस स्टीलच्या जागी खास टिटॅनियम बॉडी देण्यात आली आहे.

कॅमेरा अपग्रेट –

आयफोन 15 च्या सर्व मॉडेलमध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर कॅमेरा देण्यात आला आहे. त्यासाठी पेरिस्कोप लेन्स वापरण्यात आली आहे.

नवीन रंग –

आयफोन 15 मध्ये टायटन ग्रे, ब्ल्यू, सिल्व्हर, स्पेस ब्लॅक हे चार रंग यात असणार आहेत.

किंमत –

आयफोन 15 ची सुरुवातीची किंमत ही 90 हजारापासून सुरू होणार आहे.