फ्रेंच फेडरेशन टेनिस : विश्वजित सांगळेला विजेतेपद

27

सामना ऑनलाईन | मुंबई

फ्रान्समधील कॅनी बॅरिव्हिले इथे नुकत्याच पार पडलेल्या फ्रेंच फेडरेशन टेनिस (एफएफटी)अंतर्गत लॉन टेनिस स्पर्धेत हिंदुस्थानच्या विश्वजित सांगळेने विजेतेपद मिळकिले. विश्वजितने किताबी लढतीत यजमान फ्रान्सच्या इस्टेनबन पोटेनश्टर याचा७-५ , ६-७ , १-६ असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. एफएफटी व जीसीएसटी यांच्या सहयोगाने झालेल्या या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत विश्वजितने अर्जेंटिनाचा रॅलोट क्लेमेंट याला ६-४ ,६-४ असे सरळ सेटमध्ये नमवून अंतिम फेरी गाठली होती. विश्वजित हा मूळचा साताऱ्यामधील फलटणचा असून आता मुंबईतील मुलुंड येथे स्थायिक झाला आहे. वयाच्या १२ व्या वर्षांपासून तो टेनिस खेळत आहे. अनेक देशपातळीवरील व राज्यपातळीवरील स्पर्धांचे जेतेपद त्याच्या नावावर आहे. त्याने याआधीदेखील सिंगापूर, फ्रान्स, किर्गिस्तान या देशांत हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करून तेथे उत्तम कामगिरी केली आहे. खेळाबरोबरच तो रुईया महाविद्यालयात आपले उच्च शिक्षण पूर्ण करत आहे

आपली प्रतिक्रिया द्या