पुण्यात वारकरी प्रीमियर लीग स्पर्धा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

समाजप्रबोधनाचे काम करणाऱ्या वारकरी संप्रदायमधील लोकांच्या जीवनात एक वेगळा आनंद निर्माण करण्याच्या हेतूने ‘वारकरी प्रीमियर लीग’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वारकऱ्यांचे कीर्तनाच्या शैलीतील चौकार-षटकार आपण पाहिले किंवा ऐकले असतील, पण क्रिकेटच्या मैदानावरील चौकार-षटकार पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. ही स्पर्धा 8 व 9 मे रोजी ए. के. स्पोर्ट्स, साळुंब्रे, मावळ, पुणे येथे होणार आहे. या क्रिकेट लीगमध्ये एकूण दहा संघ सहभागी होणार आहेत. त्यामध्ये गट-अ आणि गट-ब संघात सामने होणार आहे. यात सिंहगड सुभेदार, राजगड लायन्स, तोरणा सम्राट, किंग्ज इलेव्हन सज्जनगड, पन्हाळगड योद्धा, अजिंक्य जंजिरा फायटर्स, पुरंदर वॉरियर्स, शिवनेरी टायगर्स, प्रतापगड योद्धा आणि लोहगड मावळ असणार आहेत. या माध्यमातून वारकरी संप्रदाय एकत्र येत राज्याला एक सामाजिक संदेशही देणार आहे.