भाजप नेता म्हणतो आम्हाला मुसलमानांचे एकही मत नको

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपला एकाही मुसलमान मताची गरज नाही असे विधान भाजपच्या एका नेत्याने केले आहे. कर्नाटकातील शिवमोग्गामध्ये बोलत असताना माजी मंत्री के.एस.ईश्वरप्पा यांनी हे विधान केले आहे. विरशैव-लिंगायत समाजाच्या मेळाव्यामध्ये बोलत असताना त्यांनी हे म्हटले आहे. त्यांच्यासोबत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा हे देखील या सभेत सामील झाले होते.

ईश्वरप्पा यांच्या या विधानावर लोकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला सुरूवात केली आहे. एकाने प्रश्न विचारला आहे की भाजपच्या ‘सबका साथ सबका विकास’ या घोषणेचे काय झाले? तोही एक जुमला होता का ?

एका महिलेने म्हटले आहे तशीही तुम्हाला ती मते मिळणार नाहीयेत

एका तरुणाने म्हटलंय की पंतप्रधान मोदी यांनी याच माणसाला फोन केला होता आणि त्याचा पाठिंबा मागितला होता. आता त्याने तेढ निर्माण होईल अशी विधाने करण्यास सुरुवात केली आहे, हे मोदी यांचे खरे रुप आहे.