साप्ताहिक राशीभविष्य – रविवार 14 मे ते शनिवार 20 मे 2023

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नीलिमा प्रधान

मेष : योजनांना गती मिळेल

मेषेच्या धनेषात सूर्य, चंद्र गुरू युती. ग्रहांची साथ असताना योग्य मिळते. उचित घटना आत्मविश्वास वाढवणारी चर्चा होते. नोकरीधंद्यात मनाप्रमाणे निर्णय घेता येईल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. कर्जाचे काम करा. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या योजनांना अधिक गती मिळेल. शुभ दिनांक : 14, 17

वृषभ : चौफेर सावध रहा

स्वराशीत सूर्य, चंद्र शुक्र लाभयोग. तुमच्या क्षेत्रात दिलासा देणारी घटना घडेल. वक्तव्य करताना ताळमेळ सोडू नका. नोकरीत चौफेर सावध रहा. धंद्यात समतोल राखा. तडजोड करावी लागेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आत्मविश्वासात वाढ होईल. खरेदी, विक्रीत जास्त मोह नको. कामांना कमी लेखू नका. शुभ दिनांक: 15, 16

मिथुन : धंद्यात वाढ होईल

मिथुनेच्या व्ययेषात सूर्य, चंद्र, बुध युती. अहंकाराच्या भावनेने वागू नका. बुद्धिचातुर्य उपयोगी ठरेल. नोकरीत कठीण कामे संपवा. वरिष्ठांना दुखवू नका. धंद्यात वाढ होईल. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जास्त अपेक्षा न ठेवता कार्य करा. प्रसंगानुरूप मत व्यक्त करा. खर्च होईल. स्पर्धेत जिद्द ठेवा. शुभ दिनांक: 14, 15

कर्क : कार्याला वेग मिळेल

कर्केच्या एकादशात सूर्य, चंद्र गुरू युती. सोमवार पासून तुमच्या कार्याला अधिक वेग प्राप्त होईल. संताप वाढू देऊ नका. महत्त्वाची कामे करा. व्यवहार पूर्ण करा. जवळच्या व्यक्तींना न दुखावता निर्णय घ्या. नोकरीत नविन संधी मिळेल. धंद्यात सुधारणा होईल. वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. शुभ दिनांक : 15, 16

सिंह : परदेशात जाण्याचा योग

सिंहेच्या दशमेषात सूर्य, चंद्र, गुरू युती. आठवडय़ाच्या सुरूवातीला तणाव जाणवेल. नविन कर्याची सुरूवात होईल. नोकरीत बढती होईल. परदेशात जाण्याचा योग. वाद वाढवू नका. मागील थकबाकी मिळवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कायदा पाळून संयमाने मुद्दे मांडा. प्रवासात सावध रहा. तुमचे महत्त्व वाढत जाईल. शुभ दिनांक : 14, 18

कन्या : कर्तृत्वावर विश्वास ठेवा 

कन्येच्या भाग्येषात सूर्य, चंद्र, शुक्र लाभयोग. अहंकार कडवट शब्द नको. तुमच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा. वाद वाढवू नका. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. कराराची घाई नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अचानक कलाटणी मिळण्याचा योग. कुटुंबात जबाबदारी वाढेल. मैत्री वाढेल. पूर्वीचे सहकारी मान देतील. शुभ दिनांक : 15, 16

तूळ : प्रकृतीची काळजी घ्या 

तुळेच्या अष्टमेषात सूर्य, चंद्र गुरू युती. खरेदीविक्रीच्या व्यवहारात धावपळ होईल. यश मिळेल. आर्थिक लाभ होईल. प्रकृतीची काळजी घ्या. नोकरीत कामाच्या पद्धतीत बदल होईल. धंद्यात मेहनत घ्या. फायदा होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकप्रियता वाढेल. तुमच्याशी स्पर्धा वाढेल. शुभ दिनांक : 14, 18

वृश्चिक : मनावर दडपण येईल 

वृश्चिकेच्या सप्तमेषात सूर्य, मंगळ नेपच्युन त्रिकोणयोग. मनावर दडपण येईल. वादविवादाचे प्रसंग येतील. नाकरीत कठीण कामे स्वीकारावी लागतील. धंद्यात सतर्क रहा. आर्थिक व्यवहार तपासा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधक हल्लाबोल करतील. मान, प्रतिष्ठा जपा. डावपेच कमकुवत ठरतील. शुभ दिनांक : 15, 16

धनु : तडजोड करावी लागेल 

धनुच्या षष्ठेषात सूर्य, चंद्र शुक्र लाभयोग. उत्साह वाढेल. नोकरीत तडजोड करावी लागेल. धंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सावध रहा. कट कारस्थाने वाढतील.  विरोधकांकडून राग वाढवणारी कृत्ये होतील. दौर्यात काळजी घ्या. योजनांना गतीमान ठेवता येईल. कुटुंबात तणाव जाणवेल. शुभ दिनांक : 14, 17

मकर : चांगली संधी मिळेल

मकरेच्या पंचमेषात सूर्य, मंगळ नेपच्युन त्रिकोणयोग. नविन परिचयावर जास्त विश्वास ठेवू नका. रागावर नियंत्रण ठेवा. धंद्यात गोड बोला. नोकरीत चांगली संधी लाभेल. राजकीय, सामाजिक क्षेत्राात शत्रू व मित्र ओळखणे कठीण आहे. तुमच्या ध्येयावर लक्ष ठेवून कार्य करा. प्रतिष्ठा वाढेल. शुभ दिनांक : 15, 16

कुंभ : कामात सतर्क रहा

कुंभेच्या सुखस्थानात सूर्य, चंद्र शुक्र लाभयोग. फाजिल आत्मविश्वास घातक ठरेल. तुमचा उत्साह वाढेल. नविन परिचय होतील. नोकरीच्या कामात सतर्क रहा. धंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या विरोधात कारस्थान करण्याचा प्रयत्न होईल. सावध राहून प्रसंग टाळा. स्पर्धा कठीण आहे. शुभ दिनांक : 14, 16

मीन : वाद वाढवू नका

मीनेच्या पराक्रमात सूर्य, चंद्र गुरू युती. रविवार वाद वाढवू नका. तुमच्या कार्याला वेगाने पुढे नेता येईल. गोड बोला. कर्जाच काम करा. नाकरीत चांगला बदल होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्व वाढेल. पद मिळेल. सहकार्य लाभेल. योजना पुढे न्या. कुटुंबात खेळीमेळीचे वातावरण राहील. शुभ दिनांक : 16, 18