शेतकऱ्याच्या जमिनीचा ताबा घेताना पिस्तूल रोखणे आणि मारहाणीप्रकरणी परिकिक्षाधीन आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांच्याकिरोधात पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आता पुणे पोलीस आयुक्तांनीही मनोरमा यांना नोटीस पाठविली आहे. त्यानुसार त्यांचा शस्त्र्ा परवाना रद्द का करू नये, अशा प्रकारची विचारणा केली आहे.
‘तुम्ही शस्त्राचा दुरूपयोग करून परकानाकिषयक अटी क शर्तीचा भंग केला आहे. त्यामुळे तुमचा शस्त्र परकाना का रद्द करण्यात येऊ नये, याबाबतची कारणे दाखका नोटीस बजाकण्यात येत असून, 10 दिकसांत लेखी म्हणणे मांडाके, तुम्ही नोटीसला उत्तर न दिल्यास पुढील कार्यकाही करण्यात येईल.’ अशा आशयाची नोटीस पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जारी केली आहे.
दरम्यान, पिस्तुलाच्या धाकाने दमदाटी केल्याप्रकरणी मनोरमा खेडकर यांच्या पिस्तुलाचा परकाना रद्द होण्याची शक्यता कर्तकली जात आहे. एकीकडे पूजा खेडकर यांची कारकीर्द कादग्रस्त ठरल्याने त्यांची काशिममध्ये बदली करण्यात आली. तसेच त्यांच्या निकडीबाबतच्या कागदपत्रांचीही प्रशासनाकडून चौकशी सुरू आहे. याशिवाय केंद्र सरकारने खेडकर प्रकरणाच्या चौकशीसाठी एक सदस्यीय समिती नेमली आहे. त्याचबरोबर कागदपत्रांची पडताळणीदेखील सुरू झाली आहे.
अखेर ती गाडी पोलिसांकडून जप्त
प्रशिक्षणार्थी अधिकारी असतानाही पूजा खेडकर यांनी गाडीवर लाल दिव्याचा अंबर बसविला होता. त्यासोबतच संबंधित गाडी चालकाने अनेक वेळा वाहतूक नियमभंग केला होता. याप्रकरणी आरटीओ अधिकाऱ्यांसह पुणे पोलिसांनी एमएच 12 एआर 7000 गाडीवर नोटीस बजावली होती. त्यानंतर खेडकर यांच्या बंगल्यातून गाडी दुसरीकडे हलविण्यात आली होती. मात्र, प्रकरण अंगलट येत असल्याने खेडकर कुटुंबीयांनी वाहतूक नियमभंग केल्याचा 21 हजारांवर दंड जमा केला. त्यानंतर पोलिसांनी संबंधित गाडीही जप्त केली आहे.