गिफ्ट कार्डच्या नावाखाली साडेतीन कोटी रुपयांचा अपहार, महिलेला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गिफ्ट कार्डच्या नावाखाली साडेतीन कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी महिलेला पवई पोलिसांनी अटक केली. मनतीत सहानी असे तिचे नाव आहे.

मनतीत ही पवई येथील एका आंतरराष्ट्रीय पंपनीत वरिष्ठ अधिकाऱयाकडे सहायक म्हणून काम करायची. पंपनीत काम करणाऱया कामगारांना बक्षीस म्हणून गिफ्ट कार्ड दिले जायचे. गिफ्ट कार्डच्या खरेदीचे काम ही मनतीत करत असायची. ती जास्त गिफ्ट कार्ड मागवून ठेवायची. उरलेली कार्ड ती रोख स्वरूपात विकायची. 2016 ते 2018 या काळात मनतीतने सुमारे पावणेतीन कोटी रुपयांची गिफ्ट कार्ड मागवली. 2019 मध्ये पंपनीच्या लेखा विभागाचे ऑडिट झाले. तेव्हा 29 लाख रुपयांची खरेदी झाल्याचे लेखा विभागाला लक्षात आले. लेखा विभागाने मनतीतला त्या पैशांबाबत विचारणा केली.

चौकशी दरम्यान तिने ते पैसे जुने कार्ड खरेदीचे असल्याचे सांगून माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्याची दखल घेत पंपनीने चौकशी समिती बसवून मनतीतची चौकशी केली. साडेतीन कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी पंपनीने पवई पोलीस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ निरीक्षक बुधन सावंत यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक संतोष सावंत, सहायक निरीक्षक विनोद लाड, लांडगे आदी पथकाने तपास सुरू केला. तपासा दरम्यान पोलिसांनी मनतीतला अटक केली. तिने अपहार केलेल्या पैशातून मौजमजा केल्याचे तपासात समोर आले आहे. तिला अटक करून न्यायालयात हजर केले असता तिला पोलीस कोठडी सुनावली आहे.