सोशल मीडियावर केली महिलेची बदनामी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकतर्फी प्रेमातून महिलेची सोशल मीडियावर बदनामी करणाऱया नीलेश गुप्ता याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.

तक्रारदार महिला आणि निलेश या अंधेरी येथे एका हॉटेलमध्ये काम करतात. नीलेश हा महिलेवर एकतर्फी प्रेम करायचा. महिलेकडून प्रेमाला प्रतिसाद मिळत नसल्याने नीलेशने त्या महिलेचे फोटो सोशल मीडियावरुन चोरले. ते फोटो मॉर्फ करून सोशल मीडियावर महिलेच्या नावाने बनावट अकाउंट उघडले. हा प्रकार महिलेच्या लक्षात येताच तिने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक सुर्वे, उप निरीक्षक अभिषेक पाटील यांनी नीलेशला अटक केली.