
नागपुरमधून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. पोलीस ठाण्यात दोन पुरुष तिसर्यासोबत पळून गेलेल्या पत्नीविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी आले होते. नागपूर पोलिसांच्या महिला भरोसा सेलच्या वरिष्ठ निरीक्षक सीमा सुर्वे सांगतात की, दुसरा पती महिलेला परत आणण्यास तयार आहे, पण पहिला पती तयार नाही. सुर्वे पुढे म्हणाल्या की, घरगुती हिंसाचार न झाल्याने ते या प्रकरणी कोणतीही तक्रार दाखल करू शकत नाहीत. याप्रकरणी दोन्ही पतींना सोनेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचा सल्ला देण्यात आला आहे. स्थानिक पोलिस हे प्रकरण अधिक चांगल्या पद्धतीने हाताळू शकतात, असा पोलिसांचा तर्क आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 19 वर्षीय महिलेचे तिच्या पतीसोबत प्रेमविवाह झाले होते, ज्यातून तिला दोन मुले आहेत. लग्नाच्या चार वर्षानंतर ही महिला दुसऱ्या पुरुषाच्या प्रेमात पडली आणि मंदिरात जाऊन दोन वर्षांपूर्वी त्याच्याशी लग्न केले. या महिलेने आपण अविवाहित असल्याचे समोरच्या व्यक्तीला सांगितले होते.
काही दिवसांपूर्वी ही महिला आपल्या गावी जाण्याच्या बहाण्याने दुसऱ्या पतीच्या घरातून निघून गेली होती, त्यानंतर ती परत आलीच नाही. ही महिला आता तिसर्या पतीसोबत राहत असल्याचा आरोप आहे. या महिलेची या तिसर्या व्यक्तीसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांकडे त्या व्यक्तीबाबत फारशी माहिती नाही.
पोलिसांचे म्हणणे आहे की, महिलेला अनोळखी नंबरवरून मिसकॉल येत होते. यातून दुसऱ्या व्यक्तीशी मैत्री झाली आणि यानंतर दोघांचे लग्न झाले. दोघे सोनेगाव परिसरात राहू लागले. दुसऱ्या लग्नानंतर काही वर्षांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची तिसऱ्या व्यक्तीशी मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी लग्न केले.
महिलेचा पहिला नवरा मेकॅनिक आहे. तर दुसऱ्याचा ऑप्टिक फायबरचा व्यवसाय आहे. पत्नी घरी न परतल्याने दोघांनी चौकशी सुरू केली. त्यानंतर महिलेने तिसरे लग्न केल्याचे कळाले. त्यानंतर दोन्ही पतींनी पोलीस ठाणे गाठून नागपूर पोलिसांकडे दाद मागितली. याप्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे.






























































