मालदीवचे नऊ फलंदाज शून्यावरच बाद; संपूर्ण संघ 8 धावांवरच गारद

625

दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये शनिवारी क्रिकेटमधला नीचांक पाहायला मिळाला. नेपाळ महिला क्रिकेट संघासमोर मालदीवचा संपूर्ण संघ आठ धावांवरच गारद झाला. नऊ महिला फलंदाज शून्यावरच बाद झाले. नेपाळने नऊ धावांचे आव्हान सात चेंडूंमध्ये ओलांडले. नेपाळने टी-20 इतिहासातील चौथा वेगवान विजय नोंदवला. मालदीवकडून एमा अशात हिने 12 चेंडूंमध्ये एक धाव केली. सात अतिरिक्त धावा नोंदवल्या गेल्या. नेपाळच्या अंजली चंदने अवघ्या एक धावेच्या मोबदल्यात चार फलंदाज बाद केले.

हिंदुस्थान सुसाट

हिंदुस्थानी खेळाडूंची दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतील दमदार कामगिरी शनिवारीही सुरूच राहिली. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा हिंदुस्थानने 106 पदकांसह एकूण 210 पदकांवर मोहोर उमटवली. पदकतालिकेत हिंदुस्थान पहिल्या स्थानावर कायम आहे.

आपली प्रतिक्रिया द्या