भाजपवालेच महिलांचा अपमान करतात, त्यांचा नेता मला म्हणाला….! सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल

महिला आरक्षण विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरु आहे. या चर्चेदरम्यान तृणमूल काँगेसच्या खासदार डॉ. काकोली घोष यांनी आक्रमक होत महिला पैलवानांच्या लैंगिक शोषणाचा मुद्दा उपस्थित करत सरकारला घाम फोडला. तसेच काँगेस नेत्या सोनिया गांधी यांनी या विधेयकाला पाठिंबा दिला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. चर्चेदरम्यान त्यांनी भाजपवालेच महिलांचा अपमान करत असल्याचा आरोप करत सरकारवर हल्लाबोल केला.

महिला विधेयकाला माझा पाठिंबा आहे पण मराठा आरक्षणावर सभागृहात चर्चा व्हावी, तसेत एसी, एसटी, ओबीसी महिलांना आरक्षण विधेयकात सहभागी करा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. भाजप नेत्याने मला घरी जाऊन जेवण बनवण्याचा सल्ला दिला होता. भाजपकडूनच महिलांचा सतत अपमान होत आहे, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला.

द्रमुकच्या वतीने एमके कनिमोळी बोलण्यासाठी उभ्या राहिल्या. यावेळी सत्ताधारी सदस्यांनी घोषणाबाजी केली होती. त्याला सुप्रिया सुळे यांनी विरोध केला. भाजपचे लोक महिलांचाच अपमान करतात,असे त्या म्हणाल्या. त्यानंतर भाजपवाले शांत झाले. यावरुनही सुप्रिया सुळे यांनी भाजपवर हल्ला चढवला. निशिकांत दुबे म्हणाले की इंडिया आघाडी अशा लोकांच्या बाजूने आहे जे महिलांशी अपमानास्पद बोलतात. मात्र, महाराष्ट्रातील भाजपचे एक प्रमुख नेते आहेत. त्यांनी मला सुप्रिया सुळे घरी जा, जेवण बनवा, दुसऱ्या देशात जा, असे सांगितले. यावेळी त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही. त्यांना चंद्रकांत पाटील असे म्हणाले होते. भाजपवाले असे सांगून महिलांचा अपमान करत आहेत, हीच भाजपची मानसिकता आहे, अशा हल्ला त्यांनी भाजपवर केला.