
भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने आयसीसीच्या क्रमवारीत एका स्थानाने सुधारणा केली आहे. टॉन्टन येथे इंग्लंडविरुद्धच्या निर्णायक सामन्यात कौरने नाबाद अर्धशतक झळकावले होते. त्यामुळे काwरने अव्वल 10 खेळाडूंमध्ये पुनरागमन केले आहे. आता अव्वल 10 खेळाडूंमध्ये तीन भारतीय खेळाडू आहेत. सलामीवीर स्मृती मंधाना पाचव्या क्रमांकावर, तर शफाली वर्मा फलंदाजी क्रमवारीत सातव्या क्रमांकावर आहे.

























































