women’s day – माऊली प्रतिष्ठानचा महिला गौरव सोहळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

माऊली प्रतिष्ठानतर्फे विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन चर्चगेटच्या बिर्ला मातोश्री सभागृहात 9 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता या करण्यात आले आहे.

या सोहळ्यात ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा संदेश घेऊन जगभ्रमंतीला निघालेल्या युवा पायलट आरोही पंडीत आणि किथेअर मिस्किटा, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पताका फडकावणाऱ्या योगा टीचर श्वेता वर्पे, निवृत्त कॅप्टन स्मिता गायकवाड, नृत्यगुरू अर्चना पालकर यांचा गौरव करण्यात येणार आहे. माऊलीचे सल्लागार पांडुरंग सकपाळ, अध्यक्षा मीना कांबळी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.