यवतमाळ – राळेगांव शहरातील क्रांती चौकात असलेल्या 4 दुकानांना भीषण आग, लाखोंचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसाद नायगावकर, यवतमाळ

सोमवारी रात्री 9.30च्या दरम्यान यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव शहरातील क्रांती चौकात असलेल्या 3 ते 4 दुकांनाना भीषण आग लागून या आगीत लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला आहे.

यामध्ये राळेगाव शहरातील बंडू वाघ याचे किराणा दुकान या आगीत जळून खाक झाल्याचे सांगण्यात आले आहे. तर कुणाल महाजन यांचे डेली निड्सचे दुकान व इतर दुकाने आगीत जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे.

घटनास्थळावर तत्काळ राळेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस कर्मचारी, नगरपंचायतचे पदाधिकारी यांनी ही आग महत्प्रयासाने विझवली. फटाक्यांच्यामुळे ही आग लागली असा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पाहा व्हिडीओ-