
देव तुमचा ध्येयापर्यंचा रस्ता ठकवत असतो. चाहत्यांच्या विनंतीवरून मी फेब्रुवारी महिन्यात पुन्हा मैदानात पुनरागमन करणार आहे. तुमच्या प्रेमाबद्दल आणि प्रार्थनांसाठी धन्यवाद. ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. तुमचे प्रेम नेहमी असेच ठेवा आणि हेच खऱ्या चाहत्याचे लक्षण आहे. अशा शब्दांत टीम इंडियाचा माजी डावखुरा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंग याने इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या चाहत्यांना मैदानात पुन्हा परतण्याचे आश्वासन दिले, मात्र तो कोणत्या स्पर्धेत खेळणार हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.





























































