गरीब असल्याचे भासवत करोडपती बापाने 20 वर्षे लपवली श्रीमंती; शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सांगितले सत्य

मुलांना योग्य वळण लावण्यासाठी आई वडील नेहमीच त्यांच्यावर चांगले संस्कार करण्याकरीता प्रयत्नशील असतात. काही त्यांच्या जवळील संपत्तीचा वापर करून मुलांना उत्तम पालनपोषण करतात. तर काही मेहनत करून कर्ज काढून मुलांचा सांभाळ करतात. मात्र एका लक्षाधीश बापाने स्वत:ची श्रीमंती लपवत मुलाला सामान्य जीवन जगायला शिकवले.

एका मोठया ब्रँडच्या मालकाने आपल्या मुलापासून तब्बल 20 वर्षे आपली श्रीमंती लपवून ठेवली. मुलाचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच त्याने आपल्या श्रीमंतीबद्दल मुलाला सांगितले. 24 वर्षीय Zhang Jindong नावाच्या मुलाने स्थानिक वृत्तवाहिन्यांना सांगितले की, त्याचे वडील झांग याओडुंग यांनी 20 वर्षे त्यांची आर्थिक परिस्थिती लपवून ठेवली. जेणेकरून पैशाच्या मोहापायी फुकट जाऊ नये यासाठी त्यांनी लपवून ठेवल्याचे सांगितले.

उद्योगपती झांग (51) हे हुनान मसालेदार लाटियाओ या ब्रँडचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. जे प्रतिवर्षी 600 दशलक्ष युआन किमतीच्या वस्तूंचे उत्पादन करतात. त्यांच्या मुलाचा जेव्हा जन्म झाला त्याच वर्षी हा ब्रँड सुरू करण्यात आला होता. तरीहि त्यांनी आपल्या मुलाला शहरातील एका सामान्य खोलीत वाढविले. झांग जिलोंगला आपल्या वडिलांच्या कंपनीबद्दल माहिती होती. मात्र ती कंपनी चालविण्यासाठी त्यांनी मोठे कर्ज घेतल्याचे सांगितले होते.

कौटुंबिक संपत्तीचा वापर न करता, मुलाला शिकविले. पदवीनंतर झांग जिलोंगला 6 हजार युआन पगार असलेली नोकरी शोधायची होती. जेणे करून वडिलांवरील कर्ज परतफेड करता येईल. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याच्या वडिलांनी कंपनीवर कर्ज नसल्याचे सांगितले.