भविष्य

7

मानसी इनामदार,[email protected],ज्योतिष तज्ञ

समस्या

घरात वारंवार आर्थिक समस्या उद्भवत असेल तर…

तोडगा

जर घरात पाल दिसल असेल तर तिला कोणतीही इजा पोहोचवू नका. दुरून तिला हळदीकुंकू वाहा… आणि मनातील इच्छा बोलून दाखवा. आर्थिक प्रश्न सुटतील.

मेष ...आनंदाची केंद्र
भरपूर पैसे कमविण्याचा योग आहे. तुमची कल्पकता वापराल. गडद लाल रंग जवळ ठेवा. मुलांना भरपूर वेळ द्याल. कारण मुले ही आनंदाचे स्रोत असतात. त्यांच्या केवळ असण्यानेच तुमचा उत्साह वाढेल. या आठवडय़ात त्याचा सकारात्मक परिणाम कामावर होईल. शुभ आहार …गुलाबजाम, गुलाबाचे दूध

वृषभ… फायदा होईल
लांबचा प्रवास शक्यतो टाळा. कामाच्या ठिकाणी राहूनच फायदा होणार आहे. घरात कोणालाही कठोर बोलून मन दुखवू नका. नवी व्यक्ती संपर्कात येईल. त्यातून आर्थिक फायदा होईल. पण फार विश्वास ठेवू नका. भगवा रंग जवळ बाळगा…शुभ आहार … चाट पदार्थ

मिथुन... मनाप्रमाणे घडेल

क्रीडापटू प्रकाशझोतात येतील. अनेक क्रीडा स्पर्धांमध्ये अक्वल स्थानी राहाल. नवे आर्थिक करार होतील. त्याचा व्यवसाय, उद्योगास फायदा होईल. पण अनेक गोष्टींची सांगड घालू नका. पिवळा रंग जवळ बाळगा. देवाला शेवंतीची फुले वाहा. मनोवांछित मिळेल… शुभ आहार …मका, वालाचे दाणे

कर्क…अनेक संधी
उतावीळपणाने कोणताही निर्णय घेऊ नका. अति घाई संकटात नेई. कृतीला विचारांची जोड द्या. घरच्यांचा सल्ला आवर्जून घ्या. नवी नोकरी मिळण्याच्या संधी उपलब्ध होतील. त्यांचा गांभीर्याने विचार करा. हिरवा रंग जवळ बाळगा. निसर्ग सान्निध्यात रहा….शुभ आहार… पालक, मेथी

सिंह ...घरच्यांचा पाठिंबा
शेअर बाजारातील गुंतवणूक फायद्याची ठरेल. तुळशीचे रोप स्वतःच्या हाताने लावा. रोज पाणी घाला. कोणाशीही वाद घालू नका. घरातील व्यक्तींचा पाठिंबा मिळेल. त्यांच्याशी जुळवून घ्या. कामाच्या ठिकाणी कामाचे कौतुक होईल. त्यामुळे मनात उल्हास असेल. आकाशी रंग जवळ ठेवा…शुभ आहार… कुळीथ पिठले, भात

कन्या...झटपट पैसे
तुमच्याकडे प्रचंड ऊर्जा आहे. पण विनाकारण कामाच्या ताणाने त्रासून जाल. घरातील लहान मुले तुमची काळजी घेतील. त्यामुळे मन प्रसन्न होईल. झटपट पैसे मिळवावेसे वाटतील. पण वाईट मार्ग पत्करू नका. त्यासाठी गुंतवणूक वाढवा. अनाठायी मोठे खर्च करू नका. निळा रंग जवळ बाळगा…शुभ आहार… गवती चहा, आल्याचा रस

तूळ ...नवी गुंतवणूक
प्रियजनांबरोबर सहलीला जाल. थंडीच्या वातावरणात सहलीला गेल्याने प्रसन्न वाटेल. तुम्हीही जाल. त्यामुळे आनंदी राहाल. प्रकृतीकडे दुर्लक्ष नको. वेळच्या वेळी डॉक्टरांना भेट द्या. मुलांवर रागावू नका. त्यांच्या सल्ल्याने चाला. उद्योग, व्यवसायात फायदा होईल. नवीन गुंतवणूक करा. केशरी रंग जवळ बाळगा…शुभ आहार…संत्रे, केशरी दूध

वृश्चिक… स्वकर्तृत्वावर विश्वास
आयुष्यात प्रचंड उत्साहपूर्ण घडणार आहे. त्यामुळे बरीच समीकरणे बदलतील. पैसे मिळवण्याच्या नव्या संधी उपलब्ध होतील. मित्र मैत्रिणींच्या भेटीगाठी आनंद मिळवून देतील. जुन्या आठवणी जागवाल. स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा. अंजिरी रंग जवळ बाळगा..शुभ आहार…फलाहार, अंजीर

धनु…वाहन सौख्य
घरातील आयुष्य शांततापूर्ण आणि मोहक असेल. नवी कला शिकावीशी वाटेल. जरूर आत्मसात करा. दुसऱयांना मदत करा. त्यातून पुण्यसंचित वाढेल. या आठवडय़ात अनपेक्षित धनलाभ होईल. वाहन सौख्य मिळेल. गाडी जपून चालवा. घरी चटकदार खायला मिळेल. पिस्ता रंग जवळ बाळगा..शुभ आहार …पिस्ता बर्फी, मलई पुल्फी

मकर...नवी उमेद
प्रसन्नदायी आठवडा. तब्येतीतील सुधारणेमुळे नव्या उमेदीने कामाला लागाल. हातून नवनिर्मिती घडेल. त्यामुळे जीवनात विविध रंग भरले जातील. आवडत्या गोष्टी कराल. दुसऱयावर टीका करू नका. आपल्या मार्गाने चालत राहा. चॉकलेटी रंग जवळ बाळगा…शुभ आहार …चॉकलेट, मिल्क शेक

कुंभ … मुलांचे लाड
सगळ्यांचा विरोध पत्करून तुम्ही तुमचे काम पूर्ण कराल… आणि त्यात यशही मिळवाल. त्यामुळे विरोधकांची बोलती बंद होईल. तरीही हितशत्रूंचा त्रास संभवतो. मुलांचे भरपूर लाड कराल. पण जागरूक रहा. कामाचा ताण जाणवेल. आकाशी रंग जवळ बाळगा….शुभ आहार…श्रीखंड, आंबा

मीन…स्वप्नांच्या मागे
तुमच्या वैयक्तिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करा. त्यामुळे मनाला उभारी मिळेल. आवडीचे वाचन करा. मन शांत होईल. मुलाबाळांमध्ये मन रमेल. त्यांना वेळ द्या. पण स्वतःकडे दुर्लक्ष नको. आता स्वप्नपूर्तीच्या मागे धावा. अशी संधी गमावू नका. चंदेरी रंग जवळ बाळगा.