
article by mangal gogate on nairobi
>> मंगल गोगटे
नैरोबीला ‘नियंत्रित वातावरणात’ एका कंटेनरमधे ठेवलेली फुले शेकडो मैलांचा प्रवास करून केनयाच्या मोठय़ा बंदरापाशी मोम्बासाला येतात आणि तिथून मोठय़ा बोटीने साधारण तीसेक दिवसांच्या प्रवासाला निघतात. युरोपमधे पोहोचल्यावर ही फुलं तिथे विकली जातात, तीदेखील फुलदाणीत आठवडाभर छान ताजी राहण्याच्या खात्रीने, ही नवल करण्यासारखीच गोष्ट आहे.
हे सगळे कसे काय शक्य होते?
संपूर्ण प्रवासात ही फुलं 0.5 सेल्सियस तापमानात ठेवली जातात. याशिवाय पंटेनरमधील ऑक्सिजनचे प्रमाण 4 टक्क्यापर्यंत कमी करून कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण 0.4 टक्क्यावरून 4 टक्क्यापर्यंत वाढवले जाते. त्यामुळे फुलांमधली सगळी वाढ थांबते आणि फुले सुप्त अवस्थेत जाऊन झोपी जातात. जहाजावरील माणसे ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड आणि तापमानावर लक्ष ठेवून असतात. तसे तर ती फुले झाडावरून काढल्यापासूनच त्यांची नीट काळजी घ्यावी लागते.
फुले अगदी सकाळी जरा थंड हवेत काढली जातात आणि ती ताबडतोब नियंत्रित तापमानात ठेवली जातात. तिथे ती त्यांना बुरशी वा इतर काही किडे यापासून संरक्षित ठेवण्यासाठी त्यांना एका केमिकलमध्ये बुडवून काढलं जातं. त्यानंतर प्रवासात फुलं व त्यांची देठ ओलसर राहण्यासाठी एका सोल्युशनमधे देठं बुडवून ठेवतात. एकदा सगळे सोपस्कार पूर्ण झाले की, हवा खेळती राहावी म्हणून खाली आणि वर भोक असलेल्या खोक्यात ती पॅक केली जातात.
सध्या केनया जगातील फुलांचा चौथा सगळ्यात मोठा निर्यातदार देश आहे. कारणे आहेत स्वस्त मजूर, जगात मध्यवर्ती जागा व थोडय़ा उंचावरची जमीन. कोलंबिया आणि इक्वाडोर हेदेखील या स्पर्धेत आहेत, परंतु प्रवासाचे अंतर जास्त नसल्याने या देशांना फुले निर्यात करताना एवढी काळजी घ्यावी लागत नाही. केनयाची फुले खूप अंतर पार करतात आणि शिवाय एकदा मिडल-ईस्टमध्ये पंटेनर्स लहान बोटीतून मोठय़ा जहाजात हलवले जातात. ही सर्व प्रक्रिया अगदी काळजीपूर्वक करावी लागते. कारण यात जरा जरी चूक झाली तरी त्याचे परिणाम फुलांवर वाईट होतात. इतके की, फुलांऐवजी पंपोस्ट खत युरोपमध्ये पोहोचेल.
मोम्बासा बंदर नोकरशाही आणि उशीर या दोन्हीसाठी प्रसिद्ध आहे आणि फुलांच्या पंटेनर्ससाठी वेगळी रांग नाही, तर इतर वस्तूंसारखेच ते पंटेनर्सही सगळ्या पंटेनर्सच्या रांगेत थांबतात. खरे तर इथे नाशिवंत वस्तूंच्या पंटेनर्ससाठी एक ‘हिरवी रांग’ असायला हवी होती. म्हणून महामारीच्या काळात केनया सगळी फुले हवाईमार्गे पाठवत होते आणि त्याच वेळी जानेवारी 2020 मध्ये त्याचा खर्च दर किलोसाठी 1.80 डॉलर्सपासून जून 2022 मध्ये दर किलोस 2.80 डॉलर्स एवढा वाढला. वाहतूक परिस्थिती एवढी वाईट झाली की, काही मळेकऱयांनी त्यांच्या फुलांचा नाश केला.
आता या वर्षी केनयातून फुलांचे तीनशेपेक्षा जास्त पंटेनर्स समुद्रमार्गे पाठवण्यात आले. त्यामुळे पुन्हा खर्च कमी झाला आणि ‘कार्बन फूटप्रिंटस्’ कमी झाले. कारण त्यासाठी 30 मालवाहू विमाने लागली असती. अर्थात, कार्बन फूटप्रिण्ट्स कमी करायचे असतील तर आपण जवळच उगवणाऱया फुलांचा गुच्छ खरेदी करणे केव्हाही चांगले. फुलांच्या नाशिवंत स्वभावामुळे सध्या शेतकरी नवीन जाती शोधत आहेत. एक लाल गुलाब शोधला आहे, ज्याच्या पाकळ्या जाड आहेत आणि त्यात फंगस लागण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे भविष्यात केमिकल्स कमी वापरावी लागतील.
खूप शेतकरी फुले युरोपमध्ये पोहोचेपर्यंत नर्व्हस असतात. कारण एक चूक फुलांच्या जीवावर बेतू शकते. गेल्या वर्षी एकदा फुलं चुकून सिंगापूरला गेली आणि मग ती युरोपमधे पोहोचेपर्यंत 53 दिवस लागले. अर्थात, तोपर्यंत फुलांची पार वाट लागली होती. शेतकऱयांसाठी ती फार नुकसानीची बाब होती.
समुद्रमार्गे प्रवास केलेली आणि हवाईमार्गे आलेली फुले यात विकत घेणाऱयांना फरक कळत नाही. काहींच्या मते तर समुद्रमार्गे आलेली फुले जास्त छान असतात. कारण हवाई मार्गाचा प्रवास अगदी कमी वेळाचा असतो. तरी या फुलांना अतिथंड हवेचा सामना करावा लागल्याने त्यांना प्रवासाचा त्रास होतो. याउलट समुद्रमार्गे प्रवास करणारी फुले कायम एका विशिष्ट तापमानात राहिल्याने तरतरीत राहतात.





























































