‘सोन्या’ बोलल्याने नवरा बायकोला मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मला सोन्या म्हणायचे नाही, मी इथला भाई आहे, भाई म्हणून बोलवायाचे असे म्हणत टोळक्याने पती-पत्नीला बेदम मारहाण केल्याची घटना तीन दिवसांपुर्वी हडपसरमधील सातेसतरा नळी परिसरात घडली. याप्रकरणी टोळक्यांविरूद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोन्या जगताप, जालिंदर खलसे, शुभम साखुरे, करण दहिवडे, शाहरूख, उंदNया अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आनंदा मारूती काळे (वय 25) यांनी फिर्याद दिली आहे.

तीन दिवसांपुर्वी आनंदा बुलेटवरून सातेसतरा नळी परिसरातून चालले होते. त्यावेळी बुलेटचा आवाज आल्यामुळे सोन्या जगतापने त्यांना आवाज का काढला अशी विचारणा केली. त्यावेळी आनंदाने ए सोन्या मी आवाज नाही काढला असे सांगतले. त्यामुळे राग आल्यामुळे सोन्याने त्यांना मला भाई म्हणायचे असे सांगितले. मात्र, आनंदा यांनी त्याला मी तुला सोन्याच म्हणणार, भाई तुझ्या घरचा असे म्हटले. त्याचा राग आल्यामुळे सोन्याने साथीदारांना बोलावून आनंदा यांना पट्टयाने मारहाण केली. त्यावेळी पत्नी आणि सासू भांडण सोडविण्यासाठी गेल्या असता, टोळक्याने त्यांनाही मारहाण केली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस तपास करीत आहेत.